शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

लोभी.


लोभी.

दानपेटीत देवा, पुण्य शोधतात माणसे.

रूपया पैशात भक्ती, तोलतात माणसे.

पंगतीत रावांच्या, पक्वानाची ही नासाडी,

 फेकल्या उष्ट्यावर, पोट भरतात माणसे.

डावलून समोरील, क्षण स्वर्ग सुखाचे,

मृगजळामागे मुढ, धावतात माणसे.

ऐहिक लोभापायी, तोडली ती नातीगोती,

का माणुसकीस, काळे फासतात माणसे?

कुठे जल्लोश,कुठे हैदोस असा चालला,

सरणावरही लोभी,हात शेकतात माणसे.

प्रल्हाद दुधाळ.

९४२३०१२०२०.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा