गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

कैफ

कैफ.
अंगात रग होती तारूण्याचा जोष होता
नव्हतीच जगाची पर्वा स्फुरत होते बाहू
वापरत होतो शक्ती वाट्टेल तशी
अंगातल्या त्या मस्तीच्या जोरावर
नडत राहीलो एकमेकाच्या साथीने
लुबाडत राहीलो असहाय्य दीनाना
पिडले गोरगरीबांना अगदी शरणार्थीनाही
सत्तेचा आणि शक्तीचा माज वाढत राहीला
काळ धावत होता बघत असहाय्यपणे
आणि मग एक दिवस भरले पापाचे घडे
नियती हसली  आपल्याकडे  बघत खदाखदा
आणि अखेर काळाने आपले कर्तव्य बजावले
झालो  आज गलितगात्र अंगातले त्राण संपले
नियतीच्या इशार्यावर नाइलाजास्तव
जेंव्हा आपण हत्यार टाकले मस्तवालपणाचे
आज झालो आहोत पुर्ण परावलंबी
आमचे कुत्रेही आता खात नाही हाल
काळाचीच ही कमाल  झालो बेहाल
झालोय एका एका घासासाठी महाग
नियती म्हणतेय ..
पुढच्या जन्मात तरी निट वाग !
    ,,,,,,प्रल्हाद  दुधाळ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा