रविवार, १९ एप्रिल, २०२०

व्यथा...

व्यथा...
लिहीत गेलास
जगण्याची कथा
चितारली सुरेख
अंतर्मनातली व्यथा
वाजल्या टाळ्या
 मिळाली वाहवा
लोक म्हणाले
अस्सल कविता
त्या शब्दांनी
अन रेघोट्यांनी
आला ना ढेकर
तरंगली न गाथा
... प्रल्हाद दुधाळ

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

आरसा

आरसा...
चेहरा असे आरसा
आतल्या विचारांचा..!
आठ्या त्या कपाळाच्या
उद्रेक विकारांचा..!
स्मित चेहऱ्यावरचे
वैभव जीवनाचे..!
कपट ते मनातले
मूळ हे विकारांचे..!
मुखवटे खोटे ते
क्षणासाठी सुखाचे..!
समजून हे घ्या रे
कारण खरे दु:खाचे..!
रहस्य असे खास
आनंदाचे कारण..!
जसे आहे तसेच
पारदर्शी जीवन..!
   .... प्रल्हाद दुधाळ.