बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

उपरती!

उपरती!
यॊवनाने आता दिली ती हूल!
लागली पॆलतीराची चाहूल!झुकला ना कधी मग्रुर ताठा,
आहे कबूल मला होती भूल!न उमेद, न तो जोम राहीला,
झालो वयस्क हे सत्त्य बिल्कुल!मस्तीत सदा, ना पर्वा कशाची,
मी माझ्यात होतो सदा मश्गुल!शल्य हे, रहातो उप-यासारखा ,
नाती गोती होती, बेगडी झूल!
प्रल्हाद दुधाळ.

क्रूतघ्न!

क्रूतघ्न!
आवाज आला पुन्हा जोरदार टाळ्यांचा!
उबग येतो या, राजकारणी चाळ्यांचा!

ठप्प ती सभा सारी, गप्प ही लोकशाही,
रोज नवा अंक उघडतो, घोटाळ्यांचा!

मिळताच सत्ता ती, नेते क्रूतघ्न झाले,
म्हणती ते जनता जमाव बावळ्यांचा!

लुटण्यास कट्टर शत्रूही एक झाले,
ना गंधही आता, त्या उकाळ्या पाकाळ्यांचा!

संवेदना त्या आता,त्यांना सोडून गेल्या,
न उरे एहसास, रस्त्यातील किंकाळ्याचा!
प्रल्हाद दुधाळ.