शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

वरात.

वरात.
नाहीच येत काही शंका मनात आता.
कोणीच येत नाही माझ्या घरात आता.
ओझी कुणा कुणाची होती उचलली मी
कोणी न आज येती भग्न परसात आता.
पेरले बियाणे असे मी काही फुलांचे
फोफावले असे हे काटे वावरात आता.
आव्हान देत त्यांनी युद्धास कवटाळीले
पाठीस पाय लागे एकटा रणात आता.
नाही कुणास आता दु:ख जन्म मरणाचे
माझ्याच माणसांची गेली वरात आता. 
             ....प्रल्हाद दुधाळ.