शनिवार, ३० मार्च, २०१३

गुरुवार, २१ मार्च, २०१३

सजा.


सजा.

चटका उन्हाचा वाढला,

विहीर तलाव आटला.

उरले न पाणी पिण्यास,

झाली वाडी-वस्ती ओस.

गुरे गेली छावणीला,

पोटं गेली खपाटीला.   

दाणा नाही कणगीत,

तोंडामध्ये नाही शीत.  

तगादा देई सावकार,  

लिहून दिले घरदार.

निसर्गाची नाही साथ,

गावामध्ये नाही पत.

झाला दीन बळीराजा,

कोण पापाची ही सजा?

     प्रल्हाद दुधाळ.

     ९४२३०१२०२०.

मंगळवार, १९ मार्च, २०१३

विसर .


विसर .

कोण अंगावर ते धावून गेले?

धाक मरणाचा  दाखवून गेले?

काय दोष होता दुबळ्या जनांचा,

अशी आग भेदांची लाऊन गेले !

ही भुकेली पोटे आसुसले डोळे,

चेहरे तयांचे हलवून गेले!

कष्ट ते अपार नशिबास आले,

धैर्य जगण्याचे भाराऊन गेले!

वेळ का अशी ही अचानक आली?

मते मिळाली ! शब्द विसरुन गेले?

          प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, १२ मार्च, २०१३

ज्ञानी-अज्ञानी.


ज्ञानी-अज्ञानी.

कणभर ज्यास ज्ञान नाही

वास्तवाचे परी भान नाही

तया मूर्ख असे समजावे

हात चार लांबच राहावे !

फारसे जरी ज्ञान नाही

शिकण्यास नवे ना नाही

असंस्कारी तया समजावे

संस्कारांनी सुज्ञ करावे !

तसा तो अडाणी नाही

ज्ञानाचे त्यास भान नाही

निद्रेत मग्न समजावे

जागृतीचे यत्न करावे!

मुळी ज्यास ज्ञान नाही

स्वीकारा चे भान नाही

लबाड त्यास समजावे

ढोंग तयाचे उघड करावे !

सर्वज्ञानी परी गर्व नाही

ज्ञान दानास नां नाही

गुरुपदी योग्य समजावे

ज्ञानामृत ग्रहण करावे !  

        प्रल्हाद दुधाळ

सवाल.


सवाल.

माझा तयांना हा एकच सवाल होता !

झालात कसे एवढे मालामाल होता !

काय जाहले घेतल्या त्या आणा भाकांचे ?

(मी कुठे मागितला ताजमहाल होता !)

जीवन व्हावे गाणे हीच होती मनीषा ,

झाले बेसूर जिणे सूर नां ताल होता !

माणसांनी तेथल्या पाहिली काही स्वप्ने ,

विश्वासाने जीव केला तो बहाल होता !

धर्म जाती च्या नावाने डोकी जी फुटली,

रंग रक्ताचा त्या हिरवा का लाल होता ?

                    प्रल्हाद दुधाळ.