मंगळवार, १२ मार्च, २०१३

ज्ञानी-अज्ञानी.


ज्ञानी-अज्ञानी.

कणभर ज्यास ज्ञान नाही

वास्तवाचे परी भान नाही

तया मूर्ख असे समजावे

हात चार लांबच राहावे !

फारसे जरी ज्ञान नाही

शिकण्यास नवे ना नाही

असंस्कारी तया समजावे

संस्कारांनी सुज्ञ करावे !

तसा तो अडाणी नाही

ज्ञानाचे त्यास भान नाही

निद्रेत मग्न समजावे

जागृतीचे यत्न करावे!

मुळी ज्यास ज्ञान नाही

स्वीकारा चे भान नाही

लबाड त्यास समजावे

ढोंग तयाचे उघड करावे !

सर्वज्ञानी परी गर्व नाही

ज्ञान दानास नां नाही

गुरुपदी योग्य समजावे

ज्ञानामृत ग्रहण करावे !  

        प्रल्हाद दुधाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा