शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

चारोळी.


चारोळी.

तूझ्या काही ओळी,

माझ्या काही ओळी

झाली ही तयार

झकास चारोळी!

एक एक आता

जमवू दे काडी

होईल तयार

अनुभव मोळी!

बितले दिवस

होते एक स्वप्न

विसरुन जाऊ

रात्र घन काळी!

एकरूप दोघे

संसार सुंदर

लागणार आता

ब्रम्हानंदी टाळी!

............प्रल्हाद दुधाळ.
       9423012020

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

लोभी.


लोभी.

दानपेटीत देवा, पुण्य शोधतात माणसे.

रूपया पैशात भक्ती, तोलतात माणसे.

पंगतीत रावांच्या, पक्वानाची ही नासाडी,

 फेकल्या उष्ट्यावर, पोट भरतात माणसे.

डावलून समोरील, क्षण स्वर्ग सुखाचे,

मृगजळामागे मुढ, धावतात माणसे.

ऐहिक लोभापायी, तोडली ती नातीगोती,

का माणुसकीस, काळे फासतात माणसे?

कुठे जल्लोश,कुठे हैदोस असा चालला,

सरणावरही लोभी,हात शेकतात माणसे.

प्रल्हाद दुधाळ.

९४२३०१२०२०.

 

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

स्थितप्रज्ञ.


         स्थितप्रज्ञ.

मी कुणाचे फुका, घेणार नाव नाही.
सज्जनांस येथल्या,बिल्कुल भाव नाही.

पाहण्यास स्वप्ने, मी टाळतो आताशा,
ओलांडणे कुंपण, माझी ती धाव नाही.

वल्गना दांभिकांच्या, ऐकुन राग येतो,
लाचारीने झुकणे, माझा स्वभाव नाही.

माणसांस भोवतीच्या, फुलापरी जपावे,
निमित्तास ओरखाडा,किंचित घाव नाही.

जे वाढले पुढयात, मानतो ते सुखाचे,
हरामी ऐयाशी ती,बिल्कुल हाव नाही.

          ...प्रल्हाद दुधाळ.
            ९४२३०१२०२०.
           www.dudhalpralhad.blogspot.com.