मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

कधीतरी...

कधीतरी...
कधीतरी मुक्त व्हावं वाटत
लादून घेतलेल्या जोखडातून
घ्यावा वाटतो मोकळा श्वास
सगळी मानमर्यादा ओलांडून
फाट्यावर माराव्यात वाटत
समाजाच्या जुन्या चालीरीती
झुगारून व्हावं मुक्त
सांभाळलेली बेगडी नाती
विस्कटून टाकावं वाटत
उभारलेलं सुरक्षित घरट
द्याव उधळून रानात
साठवलेलं चिपट मापट
मोडून साऱ्या चौकटी
वाटत जाव एकांतात
सोडावी वाटत आता
माझ्यातल्या ‘मी’ची साथ!

  .... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

ती सध्या काय करते?.

....ती सध्या काय करते?.....
आज 'तो' खूप वर्षानी भेटला 
त्यावेळचा रूबाब मावळला होता!
'काय रे कसा आहेस?'
माझ्या प्रश्नावर तो ओशट हसला.
'चाललय,बरंच म्हणायचं!'
त्याच्या उत्तराने जरा बरं वाटलं...
एकेकाळचा प्रतिस्पर्धी ना तो!
कुत्सितपणे माझा पुढचा प्रश्न...
'ती सध्या काय करते रे?'
याचं तोंड अजूनचउतरलं!
काय सांगू कर्मकथा
सौंदर्याने झालो पागल
तिच्यावर भाळलो
वाटलं माझ्यासारखा मीच!
हेवा वाटावा अशी आमची जोडी
माझ तिच्यावर जीवापाड प्रेम
पण...
तिचं माझ्या संपत्तीवर!
होत नव्हते ते उधळलं
तिच्या हौसेमौजेवर...
तिने हट्ट करावा
मी तो पुरवावा....
एक दिवस सगळ संपलं!
खिसा जेव्हा रिकामा झाला
धरला तिने दुसराच हात
आता फिरते आलिशान गाडीतून
मी मात्र पुरा कफल्लक!
आता याला काय विचारायचं?
तेव्हापासून ...
आलीशान मोटारीत तिला शोधतोय...
माझा प्रश्न अजूनचही अनुत्तरीत..
ती सध्या काय करत असेल?
तुम्हाला आहे काही माहिती?
ती सध्या काय करते?
...... प्रल्हाद दुधाळ.