मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

कधीतरी...

कधीतरी...
कधीतरी मुक्त व्हावं वाटत
लादून घेतलेल्या जोखडातून
घ्यावा वाटतो मोकळा श्वास
सगळी मानमर्यादा ओलांडून
फाट्यावर माराव्यात वाटत
समाजाच्या जुन्या चालीरीती
झुगारून व्हावं मुक्त
सांभाळलेली बेगडी नाती
विस्कटून टाकावं वाटत
उभारलेलं सुरक्षित घरट
द्याव उधळून रानात
साठवलेलं चिपट मापट
मोडून साऱ्या चौकटी
वाटत जाव एकांतात
सोडावी वाटत आता
माझ्यातल्या ‘मी’ची साथ!

  .... प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा