'मंद गारवा हवेत.'
लागलीसे वसंत चाहूल
ऐकू येतात कोकीळ बोल!
चल अशी तू माझ्या सवेत
मंद मंद गारवा हवेत!!
ध्यानामनात तुझाच भास
झाला सवयीचा सहवास!
सुख लाभे तुज समवेत
मंद मंद गारवा हवेत !!
अडचणी असतील लाख
ऐक माझी ही आर्त हाक!
चर्चा जमान्यात होवू देत
मंद मंद गारवा हवेत!!
सोडून देवू शरम लाज
घेवू दे हात हातात आज!
घेशील का ग मला कवेत?
मंद मंद गारवा हवेत!!
..... प्रल्हाद दुधाळ.
लागलीसे वसंत चाहूल
ऐकू येतात कोकीळ बोल!
चल अशी तू माझ्या सवेत
मंद मंद गारवा हवेत!!
ध्यानामनात तुझाच भास
झाला सवयीचा सहवास!
सुख लाभे तुज समवेत
मंद मंद गारवा हवेत !!
अडचणी असतील लाख
ऐक माझी ही आर्त हाक!
चर्चा जमान्यात होवू देत
मंद मंद गारवा हवेत!!
सोडून देवू शरम लाज
घेवू दे हात हातात आज!
घेशील का ग मला कवेत?
मंद मंद गारवा हवेत!!
..... प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा