विसर .
कोण अंगावर ते धावून गेले?
धाक मरणाचा दाखवून गेले?
काय दोष होता दुबळ्या
जनांचा,
अशी आग भेदांची लाऊन गेले !
ही भुकेली पोटे आसुसले डोळे,
चेहरे तयांचे हलवून गेले!
कष्ट ते अपार नशिबास आले,
धैर्य जगण्याचे भाराऊन
गेले!
वेळ का अशी ही अचानक आली?
मते मिळाली ! शब्द विसरुन
गेले?
प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा