सवाल.
माझा तयांना हा एकच सवाल
होता !
झालात कसे एवढे मालामाल
होता !
काय जाहले घेतल्या त्या आणा
भाकांचे ?
(मी कुठे मागितला ताजमहाल
होता !)
जीवन व्हावे गाणे हीच होती
मनीषा ,
झाले बेसूर जिणे सूर नां
ताल होता !
माणसांनी तेथल्या पाहिली
काही स्वप्ने ,
विश्वासाने जीव केला तो
बहाल होता !
धर्म जाती च्या नावाने डोकी
जी फुटली,
रंग रक्ताचा त्या हिरवा का
लाल होता ?
प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा