सजवलेले क्षण.
काही हसवणारे,काही रडवणारे,बरेचसे निसट्लेले,त्यातुनच काही अचुकपणे पकड्लेले, आनंदाने नाजुकपणे जाणीवपुर्वक सजवलेले, असे हे क्षण ज्यांनी मला आनंद दिला तेच हे! माझ्या या कविता रसिक वाचकांसाठी सादर आहेत.
आपल्या प्रतिक्रियांचे मनपूर्वक स्वागत! ...........प्रल्हाद दुधाळ. ९४२३०१२०२०.
शहर. झाला समस्यांचा आता कहर आहे. हेच आहे का माझे प्रिय ते शहर आहे? बेशिस्त वहातुक येथे धुराने माखले रस्ते, वागणे मुक्त असे की जो तो अमर आहे. शांतता लोपली अन गोंधळ येथे माजला, गांजलेली माणसे ती तनावाची लहर आहे. प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा