बुधवार, १६ जानेवारी, २०१३

रामभरोसे!


रामभरोसे!

रस्त्याने चालण्या अघोषित बंदी,
फेरीवाल्यांना फुटपाथवर संधीच संधी,
दररोजच्या प्रवासाने रिकामे खिसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
बसवाल्यांची येथे चाले मनमानी,
रिक्षावाला इथला भलताच मानी,
हळू चालवणारांचे हमखास हसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
फुटपाथ दिला विक्रेत्याना आंद्ण,
पार्किंग जागेसाठी घडोघडी भांडण,
प्रत्येकाला घाई,ट्राफिक मधे फसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
बसवाले थांबतात,रस्त्याच्या मधे,
चालणा-यांचे कान,मोबाईलच्या मधे,
बाईकवाल्यांच्या अंगी सैतान घुसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
वाहतुक शाखा झाली वसुली शाखा,
जमलच तर कधीतरी नियंत्रण होते,
सावज पकड्ण्याचे लागलय पिसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
अतिक्रमणांना तर धरबंध नाही,
पालिकेला काही पत्ताच नाही,
रस्त्यांमधे अर्ध्या विक्रेता बसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
कारभारी इथे मेट्रोचं बोलतात,
स्वार्थासाठी एकमेकाशी भांडतात,
जनांची काळजी कुणाला नसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!
प्रत्येकाला इथे भलतीच घाई,
जीवाची स्वत:च्या पर्वाच नाही,
हरेक वाहन पुढे पुढे घुसे,
पुण्याची वहातुक रामभरोसे!

   .......प्रल्हाद दुधाळ.
       ९४२३०१२०२०.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा