शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

विनाश.

विनाश.

बेरकी खुलाशांनी बेगडी दिलाशांनी,
उसनेच अवसान दिले माणसांनी!

भरकटली ही नाव अशी जीवनाची,
दिशा वेगळी दावली दुष्ट खलाशांनी!

वाट आता पाहतोय येथे मी कुणाची?
व्यापले आयुष्य अवघेच उसास्यांनी!

समजावत होतो मी माझ्याच मनाला,
वास्तवाची दिधली जाणीव नकारांनी!

हरघडी डाव मोडती कितिक येथे,
विनाश असा केला आतल्या विकारांनी!
          ..........प्रल्हाद दुधाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा