शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

गळफास!

गळफास!
कधी दुष्काळाची झळ,
कधी ओला धुमाकूळ.
झोडपते कधी गार,
बारोमास पडे मार!
दौरे, पंचनामे होती,
बडे आश्वासने देती.
आकड्यांचा मोठा खेळ,
कायमचा तोच घोळ!
वाट पाहून पाहून,
झाले जगणे कठीण.
सावकार उंबऱ्याशी,
झोबतो तो इभ्रतीशी.
तुटे तोंडीचा तो घास,
घेतला हा गळफास!  
     ....प्रल्हाद दुधाळ.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा