कटू सत्य!
जिंवंतपणाचा या कसला तोरा?
मान्य, आहेस गडगंज नी गोरा!
अहंकाराने फुगवतो का छाती?
पेटतो जशा, फटाक्यांच्या
वाती!
माणूस तू, अमरत्व तुज नाही,
उत्मात असा,नच कामाचा काही!
जीवन-मरण तुझे, घडीचा डाव,
कशास धरतो,ऐहीकाची हाव?
धनदौलत तुझी इथेच रहाते,
जेंव्हा देहाचे या,कलेवर
होते!
.....प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा