गणनायका....
वक्रतुंड तू गणनायक तू
शुभारंभाची तू देवता
असशी तूच बुद्धिदाता
विवेकही आम्हा दे आता !
माणसात माणूस नुरला
ऐहिकापायी स्वार्थाने ग्रासला
सावर तूच तू रे आता
विवेकही आम्हा दे आता !
भक्तीचे अवडंबर झाले
उत्सवात अनिष्ट माजले
दाव मार्ग तू रे भक्ता
विवेकही आम्हा दे आता !
तवकृपेने लाभावी शांती
सकल इच्छांची व्हावी पूर्ती
कळू दे इष्ट अनिष्टता
विवेकही आम्हा दे आता !
.... प्रल्हाद दुधाळ.
छान...!!!
उत्तर द्याहटवाब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून
भेट द्या http://bit.ly/2x3ka4p