रविवार, ५ जून, २०११

गमती गमतीत

गमती गमतीत.एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
........काही असे काही तसे!कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा