रंगभूमी.
आयुष्य रंगभूमी,जीवन एक नाटक.
आहेस नाटकातला तू कलाकार एक.
नाटकाची असे नियती संहिता लेखिका.
प्रयोगाचा या दिग्दर्शक साक्षात निर्मिक.
जशी तुझी भूमिका तशीच वठवायची.
पदरचे संवाद,प्रसंग नको मुळीच.
आहेस नाटकातला तू कलाकार एक.
नाटकाची असे नियती संहिता लेखिका.
प्रयोगाचा या दिग्दर्शक साक्षात निर्मिक.
जशी तुझी भूमिका तशीच वठवायची.
पदरचे संवाद,प्रसंग नको मुळीच.
हट्टाने केलास बदल,होईल अनर्थ.
सामोरे जावे लागेल रोषाला सगळ्यांच्या.
सामोरे जावे लागेल रोषाला सगळ्यांच्या.
दिग्दर्शक लेखक आणि
प्रेक्षकांच्या.
बदलून तो जाईल या नाटकाचा अर्थ.
तेंव्हा दिलेल्या भूमिकेतच ओत जीव.
दिसू दे तुझ्यातले अभिनयाचे कसब.
अभिनयाने अस्सल मिळूदे समाधान.
मग लाभेल तुलाही आनंद समाधान.
वाढेल यश किर्ती पैसा भरपूर मान.
बदलून तो जाईल या नाटकाचा अर्थ.
तेंव्हा दिलेल्या भूमिकेतच ओत जीव.
दिसू दे तुझ्यातले अभिनयाचे कसब.
अभिनयाने अस्सल मिळूदे समाधान.
मग लाभेल तुलाही आनंद समाधान.
वाढेल यश किर्ती पैसा भरपूर मान.
लेखक
दिग्दर्शकांच्या गळ्याचा ताईत तू.
म्हणून म्हणतो तू नकोच उतू वा मातू .
फक्त अभिनय तो होउ दे जीव ओतून.
दिग्दर्शकाने दिलेल्या तुझ्या भूमिकेत जा.
एकदा नजरेने या जीवनाकडे पहा!
......प्रल्हाद दुधाळ.
म्हणून म्हणतो तू नकोच उतू वा मातू .
फक्त अभिनय तो होउ दे जीव ओतून.
दिग्दर्शकाने दिलेल्या तुझ्या भूमिकेत जा.
एकदा नजरेने या जीवनाकडे पहा!
......प्रल्हाद दुधाळ.
(दि.05/11/2015, मराठी रंगभूमी दिन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा