साथ.
सखे तू छेड नवे तराणे
सूर तालात होऊ दे गाणे
गीत तुझे व्हावे ग डौलात
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I१I
शतजन्माची गाठ आपली
सूर तालाची ही गट्टी झाली
अजब गायकीचा अंदाज
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I2I
शब्द येती जे कंठामधुनी
ऐकतो मी ते जीव ओतुनी
सोडली जनामनाची लाज
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I3I
जुळल्या आपल्या मन तारा
बेसूरतेला नाहीच थारा
येऊ दे वाह वाह ची लाट
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I४ I
----- (c) प्रल्हाद दुधाळ,पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा