असच काहीतरी ....६ .
शालेय पुस्तकात,
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात,
प्रथम तू भेटला!
तीन माकडाच्या कथेतून
उमगत गेलास,
स्वातंत्र्यचळवळीतील तुझे
शांततेच्या मार्गाने लढणे,
खूप काही शिकवून गेल!
चिमूटभर मिठ उचलण्याने
ब्रिटिश साम्राज्य हादरू शकेल?
सामान्य माणसाच्या हे बुध्दीपलिकडचे!
असा तू ....असामान्य.... महात्मा!
आज मात्र तुझ्या त्या तीन माकडांकडून
लोक मात्र वेगळच शिकताहेत ....
आता अस घडतय ...
चांगले कुणी ऐकत नाही,
चांगले मुळीच पहात नाही,
चांगले बोलणे दुर्मिळ झालय!
बापू ,भारत स्वतंत्र झालाय,
पण इथली माणसे गुलाम झालीत.
..... प्रल्हाद दुधाळ.
शालेय पुस्तकात,
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात,
प्रथम तू भेटला!
तीन माकडाच्या कथेतून
उमगत गेलास,
स्वातंत्र्यचळवळीतील तुझे
शांततेच्या मार्गाने लढणे,
खूप काही शिकवून गेल!
चिमूटभर मिठ उचलण्याने
ब्रिटिश साम्राज्य हादरू शकेल?
सामान्य माणसाच्या हे बुध्दीपलिकडचे!
असा तू ....असामान्य.... महात्मा!
आज मात्र तुझ्या त्या तीन माकडांकडून
लोक मात्र वेगळच शिकताहेत ....
आता अस घडतय ...
चांगले कुणी ऐकत नाही,
चांगले मुळीच पहात नाही,
चांगले बोलणे दुर्मिळ झालय!
बापू ,भारत स्वतंत्र झालाय,
पण इथली माणसे गुलाम झालीत.
..... प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा