सोमवार, २० डिसेंबर, २०२१

सत्कर्म योगे...

सत्कर्म योगे वय घालवावे.... चिंता कटकटीना देऊन फाटा ऐकून जनाचे मनीचे करावे... शत्रू सहा ते टपलेत पहा रे बोलणे वागणे लयीचे असावे.. नको फुकाचे तेच ते देखावे सत्य जे आहे तसेच दाखवावे... नीती अनीती चाड बाळगावी कर्माच्या सिध्दांता मनी बाळगावे... आयुष्य थोडे आनंदी जगावे सत्कर्म योगे वय घालवावे... ©प्रल्हाद दुधाळ,पुणे. 9423012020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा