शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

आडगा

आडगा... 
कोणी अडवून पाहिले 
कोणी रडवून पाहिले

करून की कानाडोळा 
कोणी सडवून पाहिले 

हरबऱ्याच्या झाडावर 
कोणी चढवून पाहिले 

झळकते तेज अती 
कोणी दडवून पाहिले 

लावून ती लाडीगोडी 
कोणी घडवून पाहिले 

सोन्यारुप्यात कधी 
कोणी मढवून पाहिले 

कोडगा समजून मला 
कोणी बडवून पाहिले 

वठणीवर येत नाही 
कोणी बुडवून पाहिले 

©प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा