आत्मभान.
व्यर्थ का ते संस्कार अन
शिक्षण
बधिर झालय का आपल मन?
नावापुढील डिग्री कागदी
फ़क्त
कशाला आटवले एवढे रक्त?
मिळवले हट्टाने अमूल्य
ज्ञान
का पेलता येवू नये आव्हान?
आईबाबांच्या कष्टाचे नाही
मोल
अपेक्षा सगळ्या त्या झाल्या
का फोल?
मनमानीने गेलय आत्मसन्मान
येणार का आता वास्तवाचे
भान?
जिध्दीनेच होती स्वप्ने ती
साकार
तूच तुझ्या रे जीवनाचा
शिल्पकार!
......प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा