गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

वरात.

वरात.
दरवाजावर ऐकून दु:खांची दस्तक
स्वागतास मी उभा पूर्ण नतमस्तक.
बजावले त्याना मी देतानाच प्रवेश
घाबरली दु:खे माझा पाहून तो आवेश.
कुरवाळणे दु:खांना माझा स्वभाव नाही
फार काळ येथे लागणार निभाव नाही.
बघून उपेक्षा ती दु:खांनी काढला पळ
स्वागतास सुखांच्या मिळाले नव्याने बळ.
पलायनाची दु:खांच्या गेली सुखांना वर्दी
दारापुढे प्रवेशासाठी सुखांची ही गर्दी.
एकामागे एक सुखे येताहेत घरात
जीवनात चालू आहे आनंदाची वरात.
        .....प्रल्हाद दुधाळ.   कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा