मी -
आस्तित्व मम स्वतंत्र
होते एकदम साधी....
नव्हते किंतु परंतु
मी तुला भेटण्या आधी....
जीवन हे बदलले
मम जीवनी तू आला ....
झाले फुल हे कळीचे
श्वासाचा अर्थ कळाला....
बोल तुझे रे गोजिरे
मनात फुलले तारे....
प्रेमात विरघळता
ह्रदयी भरले वारे....
आता नकोच भीती
ओलांडू त्या खोट्या भींती....
हाती हात तो मिळता
लाभेल अनोखी शांती....
प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा