पावसा येशील?
तापलीय धरणी अती तप्त वारा
इथे
ओसाडसे रान पाण्याचा थेंब
नाही कुठे
तहानेली अर्धमेली कासाविस पाखरे
आता तरी धोधो पावसा येशील
का रे?
परवड माणसांची घरदार सोडले
पाहीलेल्या स्वप्नानाही खोल
खोल गाडले
चारा पाण्याविना तडफडती
जनावरे
आता तरी धोधो पावसा येशील
का रे?
माणसाच्या त्या सुखापायी जंगलांचा
नाश
बदल्यात आता गळ्यात दुष्काळाचा फास
मान्य सारे चुकीसाठी माफी असूदे
ना रे
आता तरी धोधो पावसा येशील
का रे?
प्रल्हाद दुधाळ, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा