असंच काहीतरी.....४.
दु:ख पचवायला
आनंद वाटायला
मनातली वादळे पेलायला
मनातले सल आतच ठेवून
चेहऱ्यावर सदैव स्मित
मिरवायला
कपाळावरच्या आठया त्यागायला
आणि ....
प्रत्येक दिवस नवा समजून
क्षण क्षण साजरा करायला
गरज असते....
एका सवयीची
हृदयाचा दरवाजा
सतत उघडा ठेवण्याची
सदा... सदैव!
....प्रल्हाद
दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा