गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

बखर.


बखर.
सुकला चेहरा झुकली नजर.
बोलल्याविनाही लागते खबर.
सोसाट्याचा वारा रणरणे ऊन
उजाडले रान संपला बहर.
लपविले जरी अपयश किती
पिटते दवंडी वाजतो गजर.
जाणीव बोथट विनाशाची वाट  
मोजावी लागते किंमत जबर.
पर्वा ती कशाला भोंदू भवताली
आपल्या हातांनी खोदली कबर.
कर्माने घडते जीवन मानवा
स्वत:च लिहावी स्वत:ची बखर.
   ... प्रल्हाद दुधाळ.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा