मी...
झोळी माझी फाटकी फकीर मी
लिहिले तरी माझे तकदीर मी
नियतीने दिधले स्वीकारले तसे
वाचली ना हातची या लकीर मी
झिजविणे उंबरे जमले मला ना
शोधले अंतरात सदा मंदिर मी
चाललो एकटा राजमार्ग तो असे
जीवनाचा या माझ्या वजीर मी
झोळी माझी फाटकी फकीर मी
लिहिले तरी माझे तकदीर मी
नियतीने दिधले स्वीकारले तसे
वाचली ना हातची या लकीर मी
झिजविणे उंबरे जमले मला ना
शोधले अंतरात सदा मंदिर मी
चाललो एकटा राजमार्ग तो असे
जीवनाचा या माझ्या वजीर मी
- .... प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा