आत्मभान...
परिस्थितीवर स्वार तुम्ही का
की परिस्थिती ती तुमच्यावर
आहेत का गुलाम ते तुमचे
की गाजवतो तो सत्ता विकार
स्थितप्रज्ञता बाणली अंगी
की लोकांमुळे अस्थिर मन
निर्णय क्षमता अबाधित ती
की कुशंका करतात बैचेन
करत रहाता ती मनमानी
की असतो मनांचा विचार
जगणे तुमचे वास्तवातले
की गुरफट भुतकाळी फार
आज आपला होई साजरा
की रमता भविष्य विश्वात
आहात इथे गर्दीचा भाग
की जगणे आभासी जगात
खाणे आहे जगण्यासाठी
की अतीभुकेचे तुम्ही गुलाम
मोह मायेने ढळते ते मन
की स्वाभिमानाचे आहे भान
ऐहिकासाठी प्रचंड शर्यत
की अनमोल असती नाती
उत्सव आहे जगणे म्हणजे
की स्वार्थात नात्यांची माती
बोथट झाल्या का संवेदनाही
की मार्दवता वाहते झुळझुळ
आयुष्य सकल हे भरो आनंदे
किंतूंची परंतूची नकोच वळवळ
... प्रल्हाद दुधाळ.
परिस्थितीवर स्वार तुम्ही का
की परिस्थिती ती तुमच्यावर
आहेत का गुलाम ते तुमचे
की गाजवतो तो सत्ता विकार
स्थितप्रज्ञता बाणली अंगी
की लोकांमुळे अस्थिर मन
निर्णय क्षमता अबाधित ती
की कुशंका करतात बैचेन
करत रहाता ती मनमानी
की असतो मनांचा विचार
जगणे तुमचे वास्तवातले
की गुरफट भुतकाळी फार
आज आपला होई साजरा
की रमता भविष्य विश्वात
आहात इथे गर्दीचा भाग
की जगणे आभासी जगात
खाणे आहे जगण्यासाठी
की अतीभुकेचे तुम्ही गुलाम
मोह मायेने ढळते ते मन
की स्वाभिमानाचे आहे भान
ऐहिकासाठी प्रचंड शर्यत
की अनमोल असती नाती
उत्सव आहे जगणे म्हणजे
की स्वार्थात नात्यांची माती
बोथट झाल्या का संवेदनाही
की मार्दवता वाहते झुळझुळ
आयुष्य सकल हे भरो आनंदे
किंतूंची परंतूची नकोच वळवळ
... प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा