सोमवार, १८ जून, २०१८

उतमात..

उतमात...
खिशामधे आहे मोप
जावू नये तो डोक्यात
धन तुझे गाडी माडी
कुचकामी रे क्षणात.

सत्ता संपतीचा मोह
विसरला तू रे नाती
माझे माझे करताना
आयुष्याची झाली माती.

पापकर्म खोटेनाटे
स्वार्थासाठी जे जे केले
जाणून घे आतातरी
खात्यामध्ये नोंदलेले.

एक दिन वेळ येता
पाप तुझे तुला जाळे
आव आण तु रे किती
नडतात कर्मफळे.

राहते रे सारे इथे
नको व्यर्थ अहंकार
क्षणभंगूर जीवन
नाव फक्त उरणार.

आता तरी हो रे जागा
वास्तव तू घे जाणून
वेळ तुझ्या हाती कमी
जग माणूस होवून.
.....प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा