गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

लग्न


लग्न  *****
म्हणतात सगळे
लग्न म्हणजे असा लाडू
जो खाल्ला तरी पश्चात्ताप
ना खाल्ला तरी पश्चात्ताप
असेही म्हणतात ....
लग्न म्हणजे ....
क्षणभर मजा -
आयुष्यभराची सजा!
कुणी मानते त्याला....
हरवलेले स्वातंत्र्य.
जेव्हढी तोंडे तेवढ्या बाता!
खरच काय आहे लग्न म्हणजे ...?
लग्न म्हणजे सहजीवन
लग्न म्हणजे समर्पण
नाजूक नात्यांचे बंधन
लग्न म्हणजे हवी हवीशी तडजोड
किंचित आंबट भरपूर गोड!
लग्न म्हणजे त्यागातला
घेण्याबरोबर  देण्यातला आनंद!
लग्न म्हणजे कुटूंबसंस्था आधार
भारतीय संस्कृतीत मोलाचा संस्कार!
लग्नामुळेच बांधली जाते..
जन्म्मोजन्मीची गाठ
आजूबाजूला पहा जरा
 लग्नाविना कित्येकांच्या आयुष्याची
लागली आहे वाट!
तेंव्हा म्हणू दे कोणी काहीबाही
लग्नाशिवाय जीवनाला अर्थ नाही!
     ,,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा