त्याग!
गोष्टी अगदी छोट्या छोट्याशा
उगाच केल्या त्या प्रतिष्ठेच्या
शब्दांची झाली मग हत्यारे
सुरू झाले वारावर वार
भडकली बदल्याची आग
जळण्याची आणि जाळण्याची
चढाओढ मग जीवघेणी
वाद प्रतिवाद ओरखाडे
नात्यांची ससेहोलपट
मन:शांतीला सदा ग्रहण
एकदा म्हणाले अंतर्मन
कशापायी सारे कशासाठी?
उत्तर अर्थात-अहंकार
ठरवले-पुरे वेडेपणा!
समजून उमजून- जेंव्हा
आपण हत्यार टाकले ते
जीवन सारे सुंदर झाले
जीवनात आता तो केवळ
अनोखी शांती आणि आनंद!
-----प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा