सोमवार, १८ एप्रिल, २०१६

पळपुटेपणा

पळपुटेपणा 
जेंव्हा आपण हत्यार टाकले 
आठवा कोण कसे ते वागले ?
अपयश प्रथमच चाखले 
पराजीत म्हणून कसे वाटले 
जगणे आहे रोजची लढाई 
जिंकण्याचीच का सदैव घाई?
कधी हरण्यात जीत असते 
माघारीत नवी रीत असते 
म्हणू दे कुणी पळपुटेपणा 
नक्कीच ठरेल शहाणपणा
हत्यार टाकून नाहीच हार 
होवू या परिस्थितीवर स्वार 
कधी जीत कधी योग्य माघार 
यशस्वी होण्याचा हाच आधार
                                        प्रल्हाद दुधाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा