सोमवार, १८ एप्रिल, २०१६

बक्षीस.

बक्षीस.
नव्हती सोपी आत्म्याशी लढाई
गाडले षड्रिपुना खोल खाई
संवादाची उत्स्फुर्ते केली घाई
मनभेदाची शक्यता ती नाही


लुटूपुटूचा खरेतर तंटा
कारणाविनाच वाजला डंका
वांझोटया त्या होत्या शंकाकुशंका
मनस्वास्थ्यावरती वरवंटा


जिंकायाचे काहीच ना राहीले
शत्रू सगळे मातीस मिळाले
जेव्हा आपण हत्यार टाकले
बक्षीस मन:शांतीचे मिळाले

----प्रल्हाद दुधाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा